आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आर्किटेक्ट मुलीच्या लग्नाचे प्रीरिसेप्शन टाळून 12 लाखांचा खर्च करून गाेशाळेचे नूतनीकरण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्किटेक्ट असलेल्या मुलीच्या लग्नाचे प्रीरिसेप्शन टाळून तब्बल १२ लाख रुपये खर्च करून गाेशाळेचे नूतनीकरण करण्यात आले. हे आदर्श पाऊल उचलले आह व्यावसायिक अमर कुकरेजा यांनी. विशेष म्हणजे त्यांच्या लेकीच्याच संकल्पनेतून या गाेशाळेची पुन:उभारणी करण्यात आली.

चहा पावडरचा व्यवसाय करणारे व्यावासयिक तथा सिंधी समाजाच्या विविध सामाजिक संस्था व जनता बँकेच्या केशव स्मृती प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असलेले अमर कुकरेजा यांची मुलगी अंकिताचा येत्या रविवारी गुजरातमधील आनंद येथे विवाह साेहळा हाेत आहे. सिंधी समाजाच्या चालीरितीप्रमाणे वधू पक्षातर्फे प्रीरिसेप्शनचा कार्यक्रम आयाेजित केला जाताे.

कुकरेजा कुटुंबीयांनी अंकिताच्या प्रीरिसेप्शनचा हा साेहळा टाळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी सिंधी समाजाची १९८५पासून असलेली संत सतरामदास गोधडीवाला घनश्याम गोशाळा पुन:उभारणी करण्याचे ठरवले. ३० आॅक्टाेबर राेजी याच गाेशाळेत प्रीरिसेप्शनएेवजी नाष्टा व चहापान केले. त्याचा खर्च साडेतीन लाख रुपये आल्याचे कुकरेजा यांनी सांगितले. या वेळी गाेपूजनही करण्यात आले.

अशी केली पुन:उभारणी : सन १९८५ मध्ये सुरू केलेल्या गाेशाळेचे तारेचे कुंपण माेडकळीस आले हाेते. त्यामुळे गायींना खुल्या वातावरणात फिरता येत नव्हते. गाेठ्यावरील शेडचे पत्रे तुटलेले हाेते. लाइट व्यवस्था निकामी झालेली हाेती. आजारी गाईंच्या गाेठ्यांची अवस्था खराब झाली हाेती. आर्किटेक्ट अंकिता यांनी स्वत:च्या संकल्पनेतून पुन:उभारणीचे काम हाती घेऊन नव्याने संरक्षक तार कंपाऊंड, शेड, पाणी साठवण्यासाठी व्यवस्थेत वाढ, शंभर फूट गव्हाणीची दुरुस्ती, चारा ठेवण्याच्या खाेलीचे प्लास्टर, वासरांसाठीची खाेली तयार करून दुरुस्तीचे काम पूर्ण केले.

बातम्या आणखी आहेत...