आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकार:न्हाई चा पाचोरा रोडच्या काँक्रिटीकरणास नकार

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईच्छादेवी चाैक ते रायसाेनी काॅलेज दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. कारण चार किलाेमीटर रस्ता काँक्रीटीकरणास ‘न्हाई’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे विभागाकडून उर्वरीत संपूर्ण रस्ता डांबरीकरणासाठी आठ काेटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यालाही मंजुरी केव्हा मिळते? यावर रस्त्याचे भविष्य ठरणार आहे.

जळगाव ते चाळीसगाव दरम्यान १०३ किमी राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षभरापुर्वीच झाले आहे. त्यामुळे रायसाेनी काॅलेजपासून नऊ ठिकाणे वगळता महामार्गावरून वाहने सुसाट धावतात. परंतु मनपा हद्दीच्या वादात रायसाेनी काॅलेजपासून ईच्छादेवी चाैकापर्यंतच्या चार किमी रस्त्याबाबत काेणताही निर्णय न झाल्याने आजही या रस्त्याचे दिवस पालटलेले नाहीत. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या कामासाठी नागरीकांसह लाेकप्रतिनिधींकडून पाठपुुरावा सुरू आहे. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रस्तावांवर प्रस्ताव पाठवणे सुरूच आहे.

काँक्रिटीकरणाला डांबरीकरणाचा पर्याय : गेल्या महिन्यात मंुबईत न्हाईच्या अधीक्षक अभियंत्यांकडे झालेल्या बैठकीत चार किमी अंतराच्या कामासाठी प्रस्ताव पाठवण्याचे ठरले हाेते. त्यानुसार ईच्छादेवी ते डीमार्टपर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येणार. उर्वरीत रस्त्याचे डांबरीकरण हाेईल असे ठरले हाेते. परंतु, न्हाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता काँक्रीटीकरणाला नकार दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण चार किमीचे डांबरीकरण करावे लागू शकते.

प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा : धुळे येथील ‘न्हाई’च्या कार्यालयाकडून आता चार किमीसाठी ६ काेटी ११ लाख रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामासाठी १८ टक्के जीएसटी लागणार असल्याने एकूण प्रस्ताव ७ काेटी ९९ लाखांचा तयार करून मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यापुर्वी देखील दाेन वेळा प्रस्ताव पाठवला. परंतु, त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा प्रस्ताव सादर केल्यानंतर मंजुरी केव्हा मिळते? याची उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...