आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी सरकारने लावलेल्या अटीमुळे गरीब विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेताना अडचणी येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. २५ मार्चनंतर काढलेला उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्र घेण्यास नकार दिला जात असल्याचे पालकांचे म्हणणे अाहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने ताेडगा काढावा, असा पालकांचा सूर अाहे. शिक्षणाचा अधिकार आरटीई कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांना प्रवेशासाठी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. शासकीय शाळांमधील गुणवत्ता कमी असल्याचे कारण देत पालक मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देतात.
परंतु खासगी शाळांमध्ये प्रवेश शुल्क जास्त आहे. ते अनेकांना परवडणारे नाही. मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आरटीई कायदा करण्यात आला.
या अंतर्गत खासगी शाळांत प्रवेशासाठी आरटीई पोर्टलवर अर्ज करावा लागतो. अर्ज करताना २५ मार्च पूर्वीची कागदपत्रे असल्याची हमी द्यावयाची होती. त्यात कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे पालकांनी कागदपत्रे असल्याचे हो असे सांगितले.
मात्र, कागदपत्र जमा करताना उत्पन्नाचा दाखला व जात प्रमाणपत्र हे २५ मार्चनंतर काढले. काहींनी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर कागदपत्रे काढले तर काहींनी नंबर लागल्यानंतर. त्यामुळे कागदपत्रांवरची तारीख ही २५ मार्च नंतरची आली आणि ती नाकारण्यात आली. शासन नियमानुसार होते पडताळणी : शासनाने दिलेल्या नियमानुसार पालकांनी कागपदपत्रे जमा करावयाची आहे. अर्ज केल्याच्या दिनांकाची कागदपत्रे पडताळणी समिती तपासते व त्यानुसार निर्णय देते. कागदपत्रांबाबत शासनाच्या नियमानुसार पडताळणी केली जाते. - विकास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.