आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकी:प्रवर्तकाने सहकारी गृहानिर्माण संस्थेच्या नोंद; शहरातील 100 सहकारी गृहनिर्माण सोसायटींवर विकासकांचीच मालकी

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियमांतर्गत विकासक, प्रवर्तकाने सहकारी गृहानिर्माण संस्थेच्या नोंदणीनंतर चार महिन्यांच्या आत जमिनीचे व इमारतीचे अभिहस्तांतरण संस्थेस करून दिले पाहिजे, अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार अंमलबजावणी न झाल्यामुळे शहरात शंभर सदनिकांचे सहकारी गृहानिर्माण संस्थांना विकासकांकडून मानीव अभिहस्तांतरण झालेले नाही. त्या सदनिकांवर तेथील रहिवाशांऐवजी विकासकांचाच मालकी हक्क कायम आहे. केवळ दोन संस्थांचे अभिहस्तांतरण झालेले असून, एक प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आलेला आहे.

सदनिकेवर रहिवाशांचा मालकी हक्क होण्यासाठी हे करा
सदनिकेची विकासकाने सहकार विभागाकडे सहकारी गृहनिर्माण सोसायटी म्हणून नोंदणी केली असल्याबाबत खात्री करा. सभासदांनी सोसायटीची नोंदणी करावी. महाराष्ट्र फ्लॅट ओनरशीप अॅक्टमधील तरतुदीनुसार विकासकाला नोटीस देऊन मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यानंतर त्या सोसायटीचा सदनिकेवर मालकी हक्क येतो.

बातम्या आणखी आहेत...