आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतर:इच्छादेवी पोलिस चौकीचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर; स्पेक्ट्रम कंपनीच्या सीएसआरमधून छोटीशी मदत

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इच्छादेवी पोलिस चौकीचे नूतन वास्तूत स्थलांतराचा कार्यक्रम मंगळवारी झाला. तांबापुरा भाग संवेदनशील आहे. वादाचे पर्यवसान दंगलीतहोणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांनी केले. एमआयडीसीच्या स्पेक्ट्रम कंपनीच्या सीएसआरमधून छोटीशी मदत मागण्यासाठी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी प्रयत्न केला होता; परंतु कंपनीचे मालक दीपक पाटील यांनी पोलिसांच्या मदतीसाठी संपूर्ण चौकी तयार करून दिली.

यापुढेही पोलिसांसह नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे मुंढे म्हणाले. परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यात येण्यापेक्षा चौकीतच तक्रारींचे निराकरण करता येईल असे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले. उपअधीक्षक कुमार चिंथा, संदीप गावित, स्पेक्ट्रमचे दीपक चौधरी, संजय भावसार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...