आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:मनपा अनुकंपा भरतीतील अडचणी त्वरित दूर करा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने अनुकंपा भरतीबाबत आपल्या स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आराेप प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केला. नगरविकास विभागाने अनुकंपा भरतीतील अडचणी दूर करून मनपाला सूचना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

गेल्या ११ वर्षांपासून महापालिकेतील मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा भरतीपासून वंचित राहावे लागले आहे. मनपात दर वर्षी अधिकारी बदलतात. त्यामुळे दरवर्षी अनुकंपा भरती संदर्भातील अडचणी वाढवल्या जात आहे. शासनानेच आपल्या पातळीवर निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतरही पालिकेकडून अडचणी उभ्या केल्या जात असल्याचे उमेदवारांचे मत झाले आहे. त्यामुळे अनुकंपा भरतीसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी बुधवारी आमदार सुरेश भाेळे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण विषय समजून घेतला. तसेच नगरविकास विभागाचे अधिकारी त्र्यंबक जाधव आणि माेहसीन बागवान यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या.

त्रुटी दाखवून अनुकंपा नियुक्ती देण्यास टाळाटाळ
प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत त्यांच्या पालकांच्या संदर्भातील आक्षेपांची माहिती दिली; परंतु महापालिका कर्मचारी मृत झाल्यामुळेच अनुकंपा भरतीची गरज भासते आहे. महाराष्ट्र नागरी अधिनियम १९७९ मधील १३ चार अन्वये कर्मचारी मृत झाल्यावर त्याच्यावरची काेणतीही कार्यवाही संपुष्टात येते, असे असतानाही तत्कालीन प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत कर्मचाऱ्यांवरील आलेल्या त्रुटी दाखवून अनुकंपा नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आराेप केला. याबाबत तीव्र नाराजीदेखील व्यक्त करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...