आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम विभाग:पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रमुख रस्त्यांची डागडुजी करा ; बांधकाम विभागाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या सूचना

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी १०३ कोटींचा निधी मंजूर असतानाही यंदा देखील पावसाळ्यात खड्ड्यांमधून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर असताना प्रमुख रस्त्यांबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी किमान प्रमुख वर्दळीचे मार्गांची दुरुस्ती करण्याच्या सूचना मनपा पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिल्या. मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी आयुक्त विद्या गायकवाड यांच्यासह शहर अभियंता नरेंद्र जावळे व अधिकारी उपस्थित होते. शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. प्रमुख रस्त्यांवर असलेले खड्डे पाहता पावसाळ्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढू शकतो हे लक्षात घेता महापालिकेने तातडीने जास्त वर्दळ असलेल्या प्रमुख रस्त्यांची डागडुजी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहे.

निधी फार मात्र काम हे थोडेफारच असल्याची टीका राज्य शासनाने ४२ कोटी व डीपीडीसीतून ६१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. वर्षभरापासून हा निधी मंजूर आहे; परंतु त्यातून करण्यात येणाऱ्या कामांचे प्रमाण मात्र थोडफार असल्याची टीका होत आहे. केवळ निधीची वल्गना करणाऱ्या मनपातील सत्ताधाऱ्यांना वेळेत निधी खर्च करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट आहे. अजूनही ४२ कोटींच्या कामांना सुरूवात न झाल्याने आता पावसाळ्यानंतरच कामे होतील यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...