आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुनर्रोपण, नवीन सर्वेक्षण केले तर वाचतील 70 वर्षे जुने 1500 वृक्ष; जामनेर-नेरी रस्त्यावर 315 झाडांवर चालली कुऱ्हाड

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वीच जिल्हा दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढे रस्ता बनवताना झाडे तोडणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यान, जामनेर ते नेरी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ७० वर्षे जुनी ३१५ वृक्ष तोडण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी मंत्री गडकरींच्या सूचनांचे पालन करून पुनर्रोपण व नवीन सर्वेक्षण केले तर अजूनही १५०० पेक्षा अधिक कडुनिंबाची वृक्ष वाचवता येणे शक्य आहे.

जामनेर ते नेरी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून या मार्गावरील महाकाय असे कडुनिबांचे वृक्ष तोडण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दाव्यानुसार ३१५ वृक्ष तोडण्यात आलेली आहेत. या रस्त्यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, सध्या ७ मीटर असलेला डांबरी रस्ता २०.७ मीटर एवढा रुंद केला जाणार आहे. रस्त्याच्या २४ मीटर क्षेत्रातील वृक्ष तोडली जात आहेत.

जामनेर शहरापासून पळासखेडे गावाच्या पुलापर्यंत ३१५पेक्षा अधिक मोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत. दरम्यान, ही वृक्ष वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा राऊळ-गिरासे यांनी सांगितले. तसे झाल्यास ७० वर्षे जुने १५०० वृक्ष वाचून पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...