आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिक विमा:पिकांच्या नुकसानीची माहिती 72 तासांत द्या; नागरिकांना सुचना

जळगाव6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला असल्यास नुकसानीबाबत तातडीने विमा कंपनीला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. विमा योजनेत अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून ही योजना रब्बी पिकासाठी आयसीआयसीआय लोमबार्ड विमा कंपनी मार्फत राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात ७ ते ९ मार्च या काळात वादळामुळे पिके आडवी झाली आहेत. हे नुकसान निकषात असल्याने तातडीने विमा कंपनीला कळवणे आवश्यक आहे. पिकाच्या फोटोसह क्रॉप इन्शूरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, ई-मेलव्दारे prabhas.arbain@icicilombard.com विमा कंपनीला ७२ तासाच्या आत नुकसानीची माहिती दिली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...