आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधक मार्गदर्शकांची यादी प्रसिद्ध:संशाेधक मार्गदर्शकांनाही नाेंदणी करणे बंधनकारक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून संशोधक मार्गदर्शकांची यादी प्रसिद्ध करण्यात येते आहे. बऱ्याच संशोधक मार्गदर्शकांनी अद्याप ओएएएसआयएसच्या पेट २०२१च्या पोर्टलवर माहिती भरलेली नाही. विद्यार्थ्यांना संशोधक देताना काही अडचणी, गैरसोय निर्माण झाल्यास माहिती न भरणारे मार्गदर्शक जबाबदार राहतील असे विद्यापीठाने एका परीपत्रकाद्वारे कळवले आहे.

‘पेट २०२१’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. त्या निमित्ताने मार्गदर्शकांसाठी काही सूचना आहेत. यात विद्यार्थी संख्या, मार्गदर्शकांची मुदत आदी नमूद करण्यात आल्या आहेत. विषेश म्हणजे आता विद्यापीठ परिक्षेत्रातील औद्योगीक क्षेत्रात, संशोधन विकास प्रयोगशाळा, तसेच संस्थामध्ये कार्य करीत असलेल्या व्यक्ती सहमार्गदर्शकाची परवानगी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...