आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:महाराष्ट्र, विदर्भसह अनेक विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियमित गाड्या सुरू करून जनरल डबे जोडण्याची सर्वसामान्य प्रवाशांकडून मागणी

सणासुदीच्या दिवसांतील होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अनेक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. अजूनही रेल्वेकडून नियमित सेवा बंद असली तरी नागरिकांना रेल्वेचा विशेष सेवांचा आधार वाटत असल्याने या विशेष गाड्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. मात्र, जळगाव स्थानकावरून जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेसह मुंबई व नागपूरकडे जाणाऱ्या इतरही गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहेत. त्यामुळे नियमित गाड्या सुरू करून या गाड्यांना जनरल डबे जोडावेत, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून होत आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेची नियमित सेवा बंद आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर रेल्वेकडून अनेक विशेष प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या. या विशेष प्रवासी गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना या गाड्यांतून प्रवास करता येत नाही. जळगाव स्थानक हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मुंबई-नागपूरसह गुजरातकडे जाता येत असल्याने मध्य व पश्चिम रेल्वेचे हे महत्त्वाचे स्थानक आहे. या विशेष गाड्यांमुळे दिवाळीनंतर गावी आलेल्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी परत जाता येणार आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण फुल्ल ...

जळगाव स्थानकावरून अनेक विशेष आरक्षित गाड्या सुरू असल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. दिवाळीची सुटी असल्याने गाड्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. मात्र, सर्वच गाड्यांची आरक्षणाची स्थिती ३० नोव्हेंबरपर्यंत फुल्लच आहे. तसेच या गाड्यांतून प्रवास करताना कोविड- १९च्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

नियमित गाड्या सुरू करून जनरल डबे जोडावेत

जळगाव मध्ये व पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. नियमित गाड्याप्रमाणेच विशेष गाड्यांनाही थांबा असला तरी गाड्यांची संख्या कमी व प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आरक्षण मिळण्यास समस्या येत आहे. त्यामुळे रेल्वेने शॉर्टटर्म गाड्या सुरू कराव्यात तसेच खान्देशातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी काहीतरी कोटा रेल्वेने आरक्षित करावा. तसेच रेल्वेने लवकरात लवकर रेल्वेने नियमित गाड्या सुरू करून या गाड्यांना जनरल डबे जोडावेत. - राजेश भराडे, अध्यक्ष खान्देश रेल्वे प्रवासी मंच

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser