आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरिविठ्ठलनगर परिसरातील धनगरवाड्याच्या पाठीमागील बाजूस गेल्या 15 दिवसांपासून गटारीचे काम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराने अर्ध्याभागात गटारीचे काम केले आहे; तर अर्ध्या भागातील गटार तशीच सोडून दिल्याने या परिसरातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या गटारीच्या कामासाठी खोल खड्डा तयार केल्यामुळे येथे पाणी साचून डासांच्या उत्पत्तीसह अडवलेले पाणी रस्त्यावरुनही जात असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
मुलांसह वृद्धांचे हाल
धनगरवाड्यालगत गटारींच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, गेल्या 15 दिवसांहून अधिक दिवस उलटूनही ठेकेदाराने उर्वरित कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे या परिसरात गटारीच्या कामासाठी तयार केलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना घरातून रस्त्यावर येण्यास अडचणी येत आहे. यात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे अधिक हाल होत आहेत.
नागरिकांची गैरसोय
कामामुळे गटार अडवल्याने या गटारीचे पाणी रस्त्यावरून देखील वाहत आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. लवकरच पावसाळ्याला देखील सुरुवात होणार असल्याने कामाल दिरंगाई झाल्यास येथील रहिवाशांना अधिक त्रास होणार आहे. तरी ठेकेदाराने उर्वरित काम लवकरात लवकर करुन नागरिकांना दिलासा द्यावा.
लवकर काम होण्याची गरज
परिसरात गटारींच्या कामाची मोठी गरज होती. आतापर्यंत काम होणे आवश्यक होते. गेल्या अनेक दिवसांपासून गटारीसाठी चारी खोदली आहे. मात्र, अजूनही काम झालेले नाही. गटारीसाठी तयार केलेल्या खड्ड्यात अनेक दिवसांपासून पाणी तुंबल्याने या पाण्याला मोठी दुर्गंधी पसरली आहे. तसेच तुंबलेल्या पाण्यावर माशा व डास घोगावत आहेत. तरी या गटारीचे काम लवकर व्हावे.
- एकनाथ वाणी, धनगरवाडा परिसर
अडचणी वाढल्या
गटारीसाठी चारी खोदलेली असल्याने घरातून रस्त्यावर येण्यास अनेक अडचणी येतात. गेल्या अनेक दिवसांपासून या खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने या पाण्याला दुर्गंधीही सुटली आहे. तसेच रात्री-अपरात्री घरातून बाहेरही पडण्यास देखील अडचणी येतात. अर्ध्या भागातच गटारी तयार असल्याने इतर भागात रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने रस्त्यावर चिखल देखील होत नाही. यात माझ्यासारख्या ज्येष्ठांचे अधिक हाल होतात.
- अनसूया महाजन, धनगरवाडा परिसर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.