आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरसह उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दुपारी ४ वाजता मायादेवीनगरातील रोटरी भवनात जिल्हा विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कर पद्धती, शासकीय धोरणावर ठराव हाेणार आहे. तसेच उद्योग, व्यापार, कृषी, ऊर्जा, इनोव्हेशन, रस्ते, विमानसेवा, ई-कॉमर्सची स्थिती, रेल्वे टोकन सेवा, औद्याेगिक इन्फ्रास्ट्रक्चर, कृषी प्रक्रिया, क्लस्टर, ब्रॅण्ड जळगाव विकसित करण्यासंबंधी मांडणी व आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा होणार आहे. यात विकासासाठी महत्त्वाची पाऊले व उद्योग विकासाचे ठोस धोरण ठरवले जाणार आहे.
नागपूर येथे बुधवारी विदर्भ विकास परिषद झाली. त्यानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, नवीन औद्याेगिक धोरण याविषयासह फ्लिपकार्ड, अॅमेझॉन यांचे वाढते प्रस्थ याचा व्यापारावर होणारा परिणाम या परिषदेत मंथन करण्यात येणार आहे. या परिषदेस जिल्ह्यातील उद्योजकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गव्हर्निंग कौन्सिल मेंबर दिलीप गांधी, संगीता पाटील, संजय दादलिका, नितीन इंगळे यांनी केले आहे.
ंमहिला उद्याेजकतेला चालना देण्याचा प्रयत्न महिला उद्योजकता व नवतरुणांना कौशल्य विकासासह उद्योगासाठी प्रोत्साहन विषयक मांडणी या विषयावर परिषदेत मंथन केले जाणार आहे. जिल्ह्यात महिला उद्योजकांची संख्या वाढावी, महिलांनी या क्षेत्रात पुढे यावे या दृष्टीने शासकीय पातळीवर कोणती उपाययोजना करण्यात येईल. यासह जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी या महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय घेऊन दुरगामी सकारात्मक परिणाम करणारे धोरण निश्चितीसाठी सहभाग देण्याचेही ठराव या वेळी केले जाणार आहे.
व्यापार वाढीसाठी चर्चा करून रूपरेषा ठरवू परिषदेत डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम संकल्पनेंतर्गत जिल्ह्यातील उद्योगांसह व्यापार वाढीसाठी चर्चा करून पुढील रूपरेषा ठरवली जाईल. शासकीय धोरण, करपद्धती यामधील तरतुदी सुधारण्यासंबधी चर्चा यासह जिल्हास्तरीय व्यापार, उद्योग परिषद आयोजनाची तारीखही ठरवली जाणार आहे. ललित गांधी, अध्यक्ष: चेंबर ऑफ कॉमर्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.