आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:धार्मिकस्थळाची पुनर्स्थापना करा; अन्यथा आंदोलन

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगावातील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढले असून या धार्मिक स्थळाची पुनर्स्थापना करावी, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन धरणगावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या १३ सप्टेंबर १९चे आदेश व नाशिक येथील अप्पर आयुक्तांच्या ११ आॅक्टाेबर २२च्या आदेशाप्रमाणे धरणगावात गट क्रमांक १२४८/२ मधील एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढले आहे. या संदर्भात धरणगाव येथील १५ मोहल्लामधील सुमारे २०० तरुणांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची ३ नोव्हेंबरला भेट घेतली.

तसेच सर्व कागदपत्र दाखवून प्रशासनाने कशाप्रकारे घटनाबाह्य व बेकायदेशीर कृत्य केले आहे, हे कागदोपत्री दाखवले. निवेदन देताना फारुख शेख, रफिक कुरेशी, नदीम काझी, रहमान शाह, अहमद पठाण, राजू बेलदार, अश्फाक शेख, अनिस शेख, जमशेर शेख, इमरान शेख, मुस्तक मोमीन, अल्ला बक्ष, जाहीर शेख आदी १७३ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...