आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुढ उकलले:​​​​​​​व्याजाचे पैसे परत करणे शक्य नसल्यामुळे कुसुंब्यातील दांपत्याचा खून केल्याचे उघड

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
संशयित आरोपी - Divya Marathi
संशयित आरोपी
  • तिघांच्या मुसक्या आवळल्या, गळा आवळून खून केल्याची कबुली

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील मुरलीधर राजाराम पाटील (वय ५४) व त्यांच्या पत्नी आशाबाई (वय ४७) या दांपत्याचा २१ एप्रिल रोजी रात्री गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली हाेती. आशाबाई यांच्याकडून घेतलेले व्याजाचे पैसे परत करणे अवघड झाल्यामुळे तसेच त्यांच्या घरातून सोने, रोकड लांबवण्याच्या उद्देशाने तिघांनी शांत डोक्याने नियोजन करून पाटील दांपत्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चार दिवसांत या हत्याकांडाचे गूढ उकलले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. देविदास नामदेव श्रीनाथ उर्फ जिलेबीवाला (वय ४०, मूळ रा. शेगाव, हल्ली रा. कुसुंबा), सुधाकर रामलाल पाटील (वय ४५, रा. चिचखेडा, ता.जामनेर) व अरुणाबाई गजानन वारंगने (वय ३०, रा.कुसुंबा) असे अटक केलेल्या तिन्ही संशयितांची नावे आहेत. अरुणाबाई गृहिणी आहे.

देविदास कुसुंबा परिसरात जिलेबीची गाडी लावतो. तर सुधाकर हा शेती काम करीत असून, तो कर्जबाजारी आहे. अटकेतील संशयितांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार, मृत आशाबाई या अनेक लोकांना १० ते २० टक्के व्याजाने पैसे देत होत्या. त्याप्रमाणे त्यांनी अरुणाबाई हिला १० ते १२ लाख व सुधाकर याला २० हजार रुपये व्याजाने दिले होते. दरम्यान, अाशाबाई यांचा स्वभाव संतापी होता. वेळेत पैसे परत न मिळाल्यास त्या महिला, पुरुषांना मारहाण करीत होत्या. यातून अरुणाबाई व सुधाकर यांनाही पैशांवरून त्यांनी अनेकवेळा झापले होते. त्यामुळे त्यांच्या मनात आशाबाईबद्दल राग होता. दरम्यान, अरुणाबाई व देविदास या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे देविदासला या सर्व गोष्टी माहित होत्या. देविदास व अरुणाबाई या नेहमी आशाबाई यांच्या घरी येत-जात असत.

गेल्या आठ दिवसांपूर्वी आशाबाई यांच्या घराशेजारी राहणाऱ्या चंद्रकला (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या घरी अरुणाबाई, देविदास व सुधाकर हे एकत्र आले होते. त्यांच्यात आशाबाई विरुद्धचा राग, संताप व्यक्त होत होता. यावेळी आशाबाई यांना जीवे ठार मारण्याचा विषय झाला; परंतु असे काही करू नका, असे सांगत चंद्रकला यांनी तिघांना विरोध केला होता; परंतु या तिघांचे तेव्हापासून नियोजन सुरू होते. आशाबाईचा खून केल्यानंतर तिच्या घरातून किमान ३५-४० लाख रुपये रोख, एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने मिळतील असाही तिघांचा समज होता. त्यामुळे त्यांनी खून करण्याचे नक्की केले होते.

अटकेतील संशयितांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार, मृत आशाबाई या अनेक लोकांना १० ते २० टक्के व्याजाने पैसे देत होत्या. त्याप्रमाणे त्यांनी अरुणाबाई हिला १० ते १२ लाख व सुधाकर याला २० हजार रुपये व्याजाने दिले होते. दरम्यान, अाशाबाई यांचा स्वभाव संतापी होता. वेळेत पैसे परत न मिळाल्यास त्या महिला, पुरुषांना मारहाण करीत होत्या. यातून अरुणाबाई व सुधाकर यांनाही पैशांवरून त्यांनी अनेकवेळा झापले होते. त्यामुळे त्यांच्या मनात आशाबाईबद्दल राग होता. दरम्यान, अरुणाबाई व देविदास या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे देविदासला या सर्व गोष्टी माहित होत्या. देविदास व अरुणाबाई या नेहमी आशाबाई यांच्या घरी येत-जात असत. गेल्या आठ दिवसांपूर्वी आशाबाई यांच्या घराशेजारी राहणाऱ्या चंद्रकला (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या घरी अरुणाबाई, देविदास व सुधाकर हे एकत्र आले होते. त्यांच्यात आशाबाई विरुद्धचा राग, संताप व्यक्त होत होता. यावेळी आशाबाई यांना जीवे ठार मारण्याचा विषय झाला; परंतु असे काही करू नका, असे सांगत चंद्रकला यांनी तिघांना विरोध केला होता; परंतु या तिघांचे तेव्हापासून नियोजन सुरू होते. आशाबाईचा खून केल्यानंतर तिच्या घरातून किमान ३५-४० लाख रुपये रोख, एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने मिळतील असाही तिघांचा समज होता. त्यामुळे त्यांनी खून करण्याचे नक्की केले होते.

माेबाइल अंधारात फेकले
घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर तिघांनी जामनेर परिसर गाठला. एका शेतात थांबून मिळालेल्या रोकडमधील प्रत्येकी २९ हजार रुपये व आशाबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने आपसात वाटून घेतले. पाटील दांपत्याचे मोबाइल त्यांनी रस्त्यातच अंधारात फेकून दिले आहेत. हे मोबाइल सापडलेले नाहीत.

अरुणाबाईने भरला पोलिसांना दम
दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिसांनी अरुणाबाईला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या वेळी तिने पोलिसांना दम भरला होता. तसेच मूळचा शेगाव येथील रहिवासी देविदास हा गुन्हेगारी स्वभावाचा आहे. त्याच्यावर शेगाव पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

तिघे दोन दिवसांपूर्वीच पाेलिसांच्या ताब्यात
एलसीबी, एमआयडीसी पोलिसांचे पथक सातत्याने या गुन्ह्यावर काम करीत होते. सर्वात आधी गोपनीय माहिती काढली, सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डवरील आरोपी तपासले. गोपनीय माहितीच्या आधारावर सुधाकर, देविदास व अरुणाबाई यांना तीन दिवसांपूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते; परंतु ठोस मुद्दे नसल्याने तसेच संशयित पोलिसांची दिशाभूल करीत असल्यामुळे उकल झाली नव्हती. या तिघांचे घटनेच्या दिवसाचे लोकेशन एकच आले. काही लोकांनी सुधाकरला घटनेच्या दिवशी पाटील यांच्या घराकडून दुचाकीने जाताना पाहिले होते. यावरून संशय पक्का झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी पहाटे तिघांना पुन्हा ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. यानंतर त्यांनी खुन केल्याची कबुली दिली अाहे.
संशयित सुधाकर पाटील

बातम्या आणखी आहेत...