आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसाठा शिल्लक:हतनूर धरणातून तापी पात्रात पिण्यासाठी लवकरच आवर्तन

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या बंधाऱ्यात सध्या आठवडाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे. यामुळे हतनूर धरणातून आवर्तन मिळणार आहे. याबाबत पलिकेने जिल्हा प्रशासनाकडे मागणी नोंदवली अाहे. बंधाऱ्यातील जलसाठा संपण्यापूर्वी हतनूर धरणातून आवर्तन मिळणार आहे. शहराला तसेच रेल्वेच्या वसाहतीसाठी तापीपात्रातील बंधाऱ्यात जलसाठा केला जातो. पावसाळ्यानंतर साधारण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची गरज भासते. सध्या शहर आणि रेल्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात सात दिवसांचा जलसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येते अाहे.

बातम्या आणखी आहेत...