आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागासवर्ग आायोगाच्या सदस्यांची बैठक:शिक्षण, शिक्षकेत्तर पदांच्या आरक्षणाबाबत घेतला आढावा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आायोगाच्या सदस्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास भेट देऊन शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या आरक्षणाबाबत आढावा घेतला. यावेळी सदस्यांनी शिष्यवृत्तीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत देखील माहिती जाणून घेतली.

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, डॉ.गजानन खराटे, डॉ.नीलिमा सरप, ॲड.बी.एल. किल्लारीकर या चार सदस्यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात बैठक घेतली. यावेळी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचाल डॉ. संतोष चव्हाण, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, उपजिल्हाधिकारी, मागासवर्ग आयोगाचे कार्यालयीन अधिक्षक राजेश वाघ, उपकुलसचिव ए.सी.मनोरे, जी.एन.पवार, सहायक कुलसचिव देवेंद्र जगताप, एन.जी. पाटील, कक्ष अधिकारी जयश्री शिंगारे, डी.बी. बागले, सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी राठोड आदी उपस्थित होते.

शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जात आहे की नाही, या प्रवर्गातील रिक्त पदे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबद्दलच्या अडचणी या बाबतची विद्यापीठ व महाविद्यालयांमधील माहिती आयोगाच्या सदस्यांनी जाणून घेतली. प्रथमच या पध्दतीची आढावा बैठक घेतली जात असून वर्षातून एकदा अथवा दोनदा आयोगाकडून विधी मंडळाला याबाबतचा अहवाल दिला जात असतो. यामागे सामाजिक न्याय पाळला जातो की नाही ही भूमिका असल्याची माहिती ॲड. किल्लारीकर व डॉ. गोविंद काळे यांनी दिली.

कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी विद्यापीठ व महाविद्यालयातील मंजूर व रिक्त पदे, त्यातील आरक्षण याबाबतची सविस्तर माहिती सदस्यांना दिली. कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी देखील सदस्यांच्या शंकांचे निरसन केले. सदस्यांनी विद्यापीठ, सहसंचालक व समाजकल्याण विभागाला काही सूचना केल्या.

बातम्या आणखी आहेत...