आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Right Minister, Five MLAs, Former MPs, Three Directors Of Zilla Bank Also Attacked The Political Stance Of Dudh Sangh.​​​​​​| Marathi News

दूध उत्पादक उरले केवळ मतदानापुरते:दूध संघाच्या राजकीय लाेण्यावर दाेन मंत्री, पाच आमदार, माजी खासदार; जिल्हा बँकेच्या तीन संचालकांचाही डाेळा​​​​​​​

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ही दूध उत्पादकांची संस्था आहे. मात्र, या संस्थेवर संचालक म्हणून येण्यासाठी या निवडणुकीत बहुतांश राजकीय घराणे, अन्य संस्थांवर पदे भाेगत असलेले दुसऱ्या फळीतील राजकीय चेहेरेच उमेदवारीसाठी मैदानात आले आहेत. त्यात दाेन मंत्री, पाच आमदार, माजी खासदार, जिल्हा बँकेच्या तीन संचालकांसह २९ राजकीय चेहरे उमेदवारी करीत आहेत. उत्पादक फक्त मतदानापुरते उरले आहेत.

दूध संघाच्या घटनेप्रमाणे आणि सहकारी कायद्यानुसार दूध संस्थेत प्रत्यक्ष काम करीत असलेल्या प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी दूध संघावर संचालक म्हणून यावेत असे अपेक्षीत आहे. प्रत्यक्षात मात्र दूध संघाशी फारसा संबंध नसलेल्या राजकारण्यांनी महत्वाची आर्थिक संस्था ताब्यात घेण्यासाठी येथे संचालक म्हणून येण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संघाच्या निवडणुकीत २० जागांसाठी तब्बल २९ राजकीय चेहेरे उमेदवारी करीत आहेत. त्यात काही राजकीय घराण्याशी संबंधित आहेत तर काही राजकीयदृष्ट्या प्रभावी लाेक आहेत. काही मूळ दूध उत्पादकांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

हे आहेत राजकीय चेहरे : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, आमदार चिमणराव पाटील, संजय सावकारे, किशाेर पाटील, मंगेश चव्हाण, अनिल पाटील आणि त्यांच्या पत्नी जि.प. सदस्या जयश्री पाटील, माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव माेरे आणि त्यांचे पुत्र पराग माेरे, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँक संचालक अॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार स्मिता वाघ आणि त्यांच्या कन्या भैरवी पलांडे-वाघ, जिल्हा बँक संचालक संजय पवार आणि त्यांच्या पत्नी साेनल पवार, माजी संचालक वाल्मिक पाटील आणि त्यांच्या पत्नी मनिषा पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर, जिल्हा बँक संचालक नाना पाटील, शैलजादेवी निकम यांचे पुत्र राेहित निकम, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, माजी नगरसेवक अमर जैन, महापाैर जयश्री महाजन यांच्या सासू मालतीबाई महाजन, जि.प.चे माजी सदस्य विनाेद तराळ, इंदिरा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील यांच्या कन्या पुनम पाटील यांचे उमेदवारी अर्ज आहेत.

बातम्या आणखी आहेत...