आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षभरातच शहरातून जाणाऱ्या महामार्गाची गुणवत्ता खराब असल्याची बाब वारंवार पुढे येत आहे. महामार्गावर आधीचे खड्डे बुजवले जात नाही ताेच आता नवीन समस्या उभी राहिली आहे. शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी महामार्गावरून वाहणाऱ्या डंपरला गळती लागल्याने डांबरमिश्रित खडी सांडून महामार्ग अधिक ओबडधाेबड झाला आहे.
शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने डांबरमिश्रित खडीचे डंपर महामार्गावरून वारंवार ये-जा करतात. त्यातून ही खडी थेट रस्त्यांवर सांडते आहे. डंपर परत जात असताना डंपरच्या मागे फालक बंद केलेले नसल्याने ही खडी परतीच्या मार्गावर अधिक प्रमाणात सांडते आहे. गेल्या आठवड्यापासून आकाशवाणी ते खाेटेनगर या रस्त्यावर खडी पडली असल्याने अपघाताचा धाेका आहे.
डांबरमिश्रित खडीमुळेच वाहनचालकांना अडचण महामार्गावर वाळू, मुरूम, माती आणि खडी वारंवार पडलेली असते; परंतु वाहनांमुळे अनेक वेळा या बाबी रस्त्याच्या कडेला फेकल्या जातात; परंतु गेल्या आठवड्यापासून डांबरमिश्रित खडी रस्त्यावर पडल्याने ही खडी डांबरी रस्त्याला चिकटली जाते. त्यावरून वाहने गेल्याने ही खडी त्याच ठिकाणी डांबरी रस्त्यात रुतून राहते आहे. परिणामी रस्ता आेबडधाेबड हाेत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत किरकाेळ अपघातही या खडीमुळे झालेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.