आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मौसम की बारीश’, वारा गाई गाणे’, ‘बरसो रे मेघा बरसो’ अशा एकाहून एक सरत गीतांनी रसिक चिंब झाले. निमित्त होते शनिवारी सायंकाळी गोदावरी संगीत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या संगीत मृगोत्सवाचे. अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, प्राचार्या पद्मजा नेवे, कथक विभागप्रमुख डॉ. महिमा मिश्रा, प्रवीण महाजन, देवेंद्र गुरव, सुशील महाजन, राजू पाटील उपस्थित होते.‘आता तरी देवा मला पावशील का’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
खुशी वाणी, आर्या सोनार, कनकश्री अय्यंगार, मंजिरी जोशी आदींनी हे गीत सादर केले. ‘घन ओथंबुनी येती’ हे गीत किरण सोनी, अनिता सूर्यवंशी, निकिता जोशी, सुरेखा चौधरी, सुनीता विसपुते यांनी सादर केले. राग यमन या रागातील पारंपरिक बंदिश ‘येरी आली पिया बीन’सादर करण्यात आली. बंदिश तान, सरमग गीत, तिहाई व तराणा वर्षा कुलकर्णी, भाग्यश्री वानखेडे, साक्षी वाणी, वैष्णवी जोशी, चेतना पाटकरी यांनी सादर केली. ‘बरसो रे मेघा बरसो रे’ या गाण्यावर रिया वर्मा, छवी शिंपी, सांची नन्नवरे, दूर्वा भारुडे लावण्या पाटील, ओवी नारखेडे यांनी नृत्य सादर केले. ‘छायी बरखा बहार’ हे नृत्य मयूरी चौधरी, सिद्धी नारखेडे, अपूर्वा अत्तरदे यांनी सादर केले. ‘सुरीला आँखो वाली’ हे गीत प्रणव ईखे, शिवम कुलकर्णी यांनी म्हटले. प्रवीण महाजन, देवेंद्र गुरव, सुशील महाजन, भूषण खैरनार यांनी संगीत साथ दिली. शीतल जोशी, भाग्यश्री वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. भूषण खैरनार यांनी आभार मानले. राजू पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, ईश्वर पाटील यंानी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.