आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्याखाली अंधार:शाहू, आंबेडकर मार्केटमध्ये रस्ता म्हणजेच पार्किंग; अर्धा रस्ता व्यापला जातोय वाहनामुळे

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने उभारलेले छत्रपती शाहू महाराज मार्केट व आंबेडकर मार्केटदेखील पार्किंगच्या समस्येपासून सुटू शकलेले नाही. एकाही वाहनाची व्यवस्था नसलेल्या शाहू मार्केटमध्ये तर सार्वजनिक रस्ता म्हणजेच पार्किंग आहे. तर आंबेडकर मार्केटमध्ये चारचाकींना नो एन्ट्री असून, जागा मिळेल तिथे मोठी वाहने नागरिकांना उभी करावी, लागताय.

भर रस्त्यावर वाहनांच्या असतात रांगा
गणेश कॉलनी ते कोर्ट चौक रस्त्यावर ट्रॅफिक गार्डनजवळ छत्रपती शाहू महाराज व्यापारी संकुल आहे. तळमजल्यावर ५२ तर पहिल्या मजल्यावर ५० गाळे, त्यात दवाखाने व क्लासेस तर तिसऱ्या मजल्यावर वकील चेंबर उभारले आहे. त्यामुळे दिवसभर वाहनांची गर्दी होत असते. गाळेधारकांच्या म्हणण्यानुसार रस्ता म्हणजेच पार्किंग आहे.

आंबेडकर मार्केटमध्येही होतेय गैरसोय
आंबेडकर मार्केटमध्ये ५६ गाळे आहेत. पहिल्या मजल्यावर शासकीय कार्यालये आहेत. तर मार्केट परिसरातच खासगी कॉलेज आहे. त्यामुळे व्यवसाय फार नसला तरी नागरिकांचे येणे-जाणे सुरूच असते. मार्केटच्या दक्षिण बाजूने एका बाजूला वाहने उभी करायला जागा आहे; परंतु त्या ठिकाणी ३० ते ४० वाहनेच उभी राहण्याची सोय आहे.

बातम्या आणखी आहेत...