आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Road Work Was Done On Paper In Bhadgaon Of Khandesh Fraud Of 1.5 Lakhs In Paver Block Work, Case Registered Against Four Persons Including Sub engineer

खानदेशातील भडगावात कागदावर झाले रस्त्याचे काम:पेव्हर ब्लॉकच्या कामात दीड लाखांची फसवणूक, उपअभियंत्यासह चौघांवर गुन्हा

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे पेव्हर ब्लॉकचे काम प्रत्यक्षात झालेच नाही. मात्र कागदावर काम झाल्याचे दाखवण्यात आले. प्रत्यक्षात एकही पेव्हर ब्लॉक बसवलेला नव्हता. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यासह चौघां विरुद्ध गुरुवारी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दिड लाख रुपयांचा अपहार झाला आहे.

या संदर्भात विस्तार अधिकारी भालचंद्र नाटू पाटील(वय 57, रा.वृंदावन कॉलनी, ढेकू रोड, अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, 2019-20 मधील पळासखेडे ता. भडगाव येथील ग्राम पंचायतीला 2515 या लेखा शिर्षाखाली पेव्हरब्लॉक बसवण्याबाबत कामाचे अनुदान प्राप्त होते.

कागदावर झाले काम

पळासखेडे येथील शिवाजी पाटील ते बहादुर पाटील यांच्या घरापर्यंतचे 99 चौरस मीटर तसेच तुकाराम पाटील ते रतीलाल पाटील यांच्या घरापर्यंतचे 42.05 चौरस मीटर ऐवढ्या प्रमाणात पेव्हर ब्लॉक बसवायचे होते. संबधितांनी हे काम सुरूच केले नाही. कागदावर मात्र पेव्हर ब्लॉक बसवल्याचा शेरा मारला. हीच कागदपत्रे वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आली.

उघडकीस आला प्रकार

दरम्यान, जर गावात पेव्हर ब्लॉकच बसलेले नाही, तर त्याचे बिल अदा कसे झाले? याची कुणकुण सुरू झाली. कुणीतरी ही माहिती वरीष्ठ कार्यालयाला कळवली. यानंतर भडगाव पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय बी. लखवाल यांनी प्रत्यक्ष गावात भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम झालेले आढळून आले नाही. हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या कामात 1 लाख 46 हजार 420 रुपयांचा अपहार, फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

या अपहरास दोषी असेलेले संदीप लक्ष्मन शेलार (तत्कालीन उपभियांता जि.प. बांधकाम उपविभाग, एरंडोल), योगेश नंदकिशोर थोरात (तत्कालीन शाखा अभियंता, जि.प.बाधकाम उपविभाग, एरंडोल), धनसिंग परशुराम राजपूत (तत्कालीन विस्तार अधिकारी, सेवानिवृत्त पंचायत समिती, भडगाव) व राजेंद्र पिराजी सोनवणे (तत्कालीन ग्रामसेवक पळासखेडे, ता.भडगाव) या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...