आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या सुटेना:पार्वतीनगरात 40 वर्षांपासून रस्त्यांच्या कामाची प्रतिक्षा; मनपाचा कानाडोळा ; साफसफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्वतीनगरात गेल्या ४० वर्षांपासून रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यातच या परिसरात ५० कॉलन्यांतील ४०० ते ४५० रस्ते-गटारींच्या साफसफाईसाठी केवळ ४३ लोकांचीच नेमणूक असल्याने या परिसरात गटारींची अधिक बिकट समस्या आहे. त्यातच या परिसरात ४० वर्षांपासून रस्ते नाहीत. अशी स्थिती या परिसरातील गटारींची झाली असल्याने आता तरी या परिसरातील रस्ते गटारी करण्याची गरज असल्याची भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पार्वतीनगरासह साने गुरुजी कॉलनी, स्नेहल कॉलनी, पारखनगर, टेलिफोननगर, वल्लभनगर आदी परिसरात रस्ते, गटारींची वानवा आहे. हा परिसर उच-सखल भागात वसला आहे. येथील अनेक भागात कच्चे उखळलेले रस्ते तर आहेतच याच बरोबर तुटलेल्या गटारींमुळे देखील येथील नागरिक त्रस्त झाले आहे. काही लोकांनी या परिसरातील गटारींवर गाड्या लावण्यासाठी बंदिस्त केल्या असल्याने जेथे गटारी उघड्या आहेत अशा भागात हे नागरिक आपल्या घरपरिसरातील कचरा टाकून देत असल्याने वादही होत आहे.

परिसरात गटारी तयार करण्याची गरज ^परिसरात ठिकठिकाणच्या गटारी तुटल्या आहे. तर अनेकांनी येथील गटारी काढल्या जात नाहीत म्हणून बुजवून ठेवल्या आहेत. तसेच अनेकांनी आपआपल्या घराजवळील गटारींवर ढापे टाकल्याने त्या बंदिस्त झाल्याने येथील नागरिक समोरिल उघड्या गटारीत आपल्या घर-परिसरातील कचरा या उघड्या गटारीत टाकत असल्याने वादविवादाचे प्रसंग ही होत असल्याने या परिसरात गटारी सर्वत्रच बंदिस्त गटारी बनण्याची गरज आहे. बापू कुमावत, पार्वतीनगर

डास निर्मूलनासाठी फवारणी त्वरित करावी ^परिसरात गटारींचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यातच या गटारीही काढल्या जात नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने या परिसरात महापालिकेकडून नियमित फवारणीची गरज आहे. तसेच येथे या परिसरात पसरलेल्या मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची देखील गरज आहे. गेल्या कित्येक वर्षात हे वृक्ष न छाटल्याने कोरड्या फांद्या पडून अपघात होऊ शकतो. एकनाथ बडगुजर, पार्वतीनगर

४० वर्षांपूर्वी पार्वतीनगरात अटलांटा कंपनीने तयार करण्यात आले होते रस्त ^पार्वतीनगरात गेल्या ४० वर्षांपासून रस्त्यांची वानवा आहे. ४० वर्षांपूर्वी पार्वतीनगर परिसरात अटलांटा कंपनीमार्फेत या परिसरात रस्ते तयार करण्यात आले होते. आज या परिसरातील एकही रस्ता धड लाहिलेला नाही. सर्वच रस्ते कच्चे आहेत. पाववाळ्यात या परिसरात अधिक दयनीय स्थिती होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पार्वतीनगर परिसरात रस्ते तयार करण्याची गरज आहे. रमेश पवार, पार्वतीनगर

बातम्या आणखी आहेत...