आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात तुंबते पाणी:विवेकानंदनगर, स्नेहल कॉलनीत रस्त्यांची कामे, गटारीवरील ढापे उंच करण्यासह निमुळत्या गटारी रुंद करण्याची गरज

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेकानंदनगर, स्नेहल कॉलनी परिसरात रस्ते तयार करण्यासह गटारीवरील ढापे, निमुळत्या गटारी रुंद करण्याची गरज आहे. या गटारीवरील ढापे जमिनीलगत असल्याने व या ढाप्यांखालून बीएसएनएलच्या वायरी गेलेल्या असल्याने येथे मोठ्याप्रमाणात गाळ साठून पाणी वाहतुकीस अडथळा येतो. तर विवेकानंदनगरात नाल्यावर उंच पूल नसल्याने स्नेहल कॉलनी व विवेकानंदनगरासह या परिसरातील अनेक खोलगट भागात पावसाळ्यात पाणी तुंबून या परिसराचा संपर्क तुटतो.

विवेकानंदनगर, स्नेहल कॉलनीचा परिसर खोलगट भागात येत असल्याने या परिसरात नाल्यांद्वारे 10 ते 15 कॉलनी परिसरातून पाणी वाहून येते. येथील गटारी खोल असल्या तरी काही भागात त्या खूप निमुळत्या झाल्या आहेत. या गटारी ठिकठिकाणी तुटल्याने अनेक भागात त्याला वनस्पतींनी देखील वेढले आहे. तर विवेकानंद नगरात नाल्यावरील पूल जमिनीलगत असल्याने पावसाळ्यात येथील अनेक भागात पाणी तुंबून हा परिसर जलमय होतो. तसेच पावसाळ्यात गटारींचे पाणी जमिनीलगतच्या घरांत शिरते. त्यामुळे हा पूलही उंच करण्याची गरज आहे.

गटारींच्या खालील वायरी काढून ढापा उंच करावा

या परिसरात गटारींची नियमित साफसफाई केली जात नाही. तरी गटारींची नियमित साफसफाई करण्यात यावी. तसेच या गटारीमधील बीएसएनएलच्या वायरी काढून या परिसरातील सर्वच ढापे उंच करण्याची गरज आहे. हे ढापे उंच नसल्याने 15 कॉलनी परिसरातील वाहून येणाऱ्या पाण्याला अडथळा होतो. तर पावसाळ्यात या गटारींमध्ये पाणी तुंबून ते पाणी मोठ्याप्रमाणात रस्त्यांवरून वाहते, असे स्नेहल कॉलनी रहिवासी रवी अत्तरदे यांनी म्हटले.

नाल्यावरील पूल उंच करण्यासह गठडे गरजेचे

विवेकानंदनगरातील नाल्यावरील पूल उंच करण्यासह गठडे होणे गरजेचे आहे. ल्यावरील पूल जमिनीपासून खोल गेलेला असल्याने थोडाही पाणी झाला तरी येथे मोठ्याप्रमाणात पाणी तुंबते. त्यामुळे नाल्यावरील पूल जमिनीपासून उंच करण्याची गरज आहे. तसेच हा पूल खोल तर आहेच याच बरोबर या पुलाला कठडेही नाही. त्यामुळे पावाळ्यात थोडाही पाणी पडला तरी येथून रहदारी बंद होते, असे विवेकानंदनगर रहिवासी रामेश्वर मुठे यांनी म्हटले.

पावसाळ्यात येते घरात पाणी

स्नेहल कॉलनीचा परिसर खोलगट भागात वसलेला आहे. पावसाळ्यात गटारी निमुळत्या असल्याने हे पाणी रस्त्यांवर येते. कच्चे रस्ते, निमुळत्या गटारींमुळे पावसाळ्यात या परिसरातील जनसंपर्क तुटतो. स्नेहल कॉलनीतल नाल्यावरील पुलावर नवीन कठडे होण्याची गरज आहे. पावाळ्यात जमिनीलगतच्या अनेक घरांतही पाणी शिरते. त्यामुळे या परिसरात रस्ते, गटारींची कामे होणे गरजेचे आहे, असे स्नेहल कॉलनी रहिवासी सुनीता अत्तरदे यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...