आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कृषीची रिक्तपदे भरण्यासाठी रास्ता रोको; पारोळ्यात शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन

पारोळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका कृषी कार्यालयातील रिक्तपदे तत्काळ भरण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रिक्तपदे भरण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुका कृषी कार्यालयासाठी ४४ पदे मंजूर आहेत, त्यापैकी फक्त आठ कर्मचारी असून त्यांच्यावर ११४ गावांचा भार आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही पदे भरली जात नसल्याने तालुका शेतकरी संघटनेचे नेते डॉ.पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी व इतर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.

कृषी अधिकारी जाधवर व तालुका कृषी अधिकारी वारे यांनी देत रिक्त पदांपैकी चार पदे ही चार दिवसाच्या आत भरण्यात येतील असे आश्वासन दिले. काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, भडगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अभिमन हटकर, मनोज परदेशी, नरेश चौधरी, नीलंकठ पाटील, गुलाब पाटील, राकेश वाघ, विजय पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...