आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळाचा अल्टिमेटम:गणेश विसर्जन नव्हे स्थापनेपूर्वीच रस्ते चकचकीत करावेत; अन्यथा आंदाेलन

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच वर्षांपूर्वी खराब रस्त्यांमुळे शहरात एका गणेशमूर्तीची विटंबना झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी समन्वयाने वाद मिटवण्यात आला; परंतु अशा घटनेची पुनरावृत्ती यंदा होऊ नये म्हणून प्रशासनाने विसर्जनाची वाट न पाहता स्थापनेपूर्वीच शहरातील रस्ते चकचकीत करावे. अन्यथा गणेश महामंडळांकडून आंदोलन केले जाईल असा ‘अल्टिमेटम’ मंगळवारी झालेला पहिल्याच बैठकीत गणेशभक्तांकडून देण्यात आला.

जिल्हा नियोजन भवनात मंगळवारी गणेश महामंडळाची समन्वय बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध गणेश मंडळे व शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित गणेशभक्तांनी तक्रारी मांडल्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गणेशाचे पावित्र्य राखत सन्मानपूर्वक उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनीही पुरेशा बंदोबस्तासह संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विसर्जनापूर्वी पुन्हा गणेशभक्तांची बैठक घेण्यासह गणेशभक्तांच्या तक्रारी, सोयीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याचीही मागणी केली. बैठकीत चर्चेत महामंडळाचे किशोर भोसले, सूरज दायमा, दीपक दाभाडे, विनोद त्रिपाठी व शहरातील विविध गणेश मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, महावितरण अभियंता, महापालिका अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

यंदा ‘शान,संयम और तिंरगा’ या थीमवर उपक्रम

यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळे गणेश महामंडळांकडून संपूर्ण गणेशोत्सवात ‘शान, संयम और तिरंगा’ थीमवर आधारित कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सर्व मंडळांनी या थीमवर देखावे, आरास, विसर्जन मिरवणुकीतील नाट्य आदी तयार करावे असे अध्यक्ष सचिन नारळे यांनी सांगितले.
राज्य शासनाने गणेशोत्सवावरील निर्बंध उठवले असून, यंदा दणक्यात उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी वीज वितरण, कुंड मदत यंत्रणेची पुरेशी व्यवस्था करावी.

सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून एक खिडकी योजना सुरू करावी. परवानगीची प्रक्रिया ऑनलाइन करावी. गणरायाच्या स्थापने आधीच मनपाने रस्ते दुरुस्ती करावी, मिरवणूक मार्गावरील पथदिवे सुरू करावे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासह गणेश मंडळांना सलग पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी द्यावी.

बातम्या आणखी आहेत...