आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार’:वाल्मीकनगरात जीर्ण वीज खांबाला दोराचा ‘आधार’ ; महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाल्मीकनगरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील बालाजी मंदिराच्या मागील भागातील वीज खांब जमिनीलगत जीर्ण झाला आहे. तसेच हा खांब वाकला आहे. या खांबाबाबत स्थानिक नगरसेवक दत्तू कोळी व रंजना सपकाळे यांच्यासह गणेश कोळी यांनी अनेकदा तक्रारी करूनही खांब बदलवला जात नाही. या खांबामध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे ज्येष्ठ नागरिकाला विजेचा धक्काही बसला आहे. मात्र, तरीही महावितरण चालढकल करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाल्मीकनगरात गुलाबशेठ यांच्या वाड्याजवळील महावितरणचा वीज खांब जमिनीलगत व खाली पूर्णपणे गंजून गेला आहे. याबाबत २० मे रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. निवेदनावर विनोद सोनवणे, रंजित सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, विलास कोळी, राहुल सोनवणे, ललित ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

बातम्या आणखी आहेत...