आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा नाही:डिझेलच्या दरात 7 रुपयांची घसरण; दरवाढीमुळे वाढलेले टान्सपाेर्ट भाडे कमी हाेण्याचे नाव घेई ना!

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सब- इंधन दरवाढीच्या वेळी 25 टक्के वाढलेले दर किमान 15 टक्के कमी हाेण्याची अपेक्षा व्यक्त हाेत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी पेट्राेल, डिझेच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली. त्याचे पडसाद ट्रान्सपाेर्टच्या भाड्यावर हाेऊन तब्बल 25 टक्के भाडेवाढ झाली हाेती.

मात्र गेल्या महिन्यात डिझेलच्या दरात प्रति लिटरमागे 7 रुपयांची माेठी घसरण झाली आहे. असे असताना तरी ट्रान्सपाेर्टच्या भाडे अद्याप तेच आहे. दरम्यान, वाहनांची कमी उपलब्धता असणे हे दर कमी न हाेण्यामागील प्रमुख कारण असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

माल वाहतूकांचे होत आहे हाल

जळगाव शहरात असलेल्या ट्रान्सपाेर्ट नगरातून दिवसाला 250 ते 300 ट्रकच्या माध्यमातून जिल्हा अंतर्गत व परराज्यात विविध मालाची ने-आण केली जाते. गेल्या जानेवारी महिन्यात ट्रान्सपाेर्टच्या दरात इंधन दरवाढीमुळे तब्बल 25 टक्के भाव करण्यात आला. त्यामुळे पुणे, मुंबई या प्रमुख शहरात माेठ्या प्रमाणावर मालाची ने-आण केल्या जाणाऱ्या रुटचे ट्रकचे एका बाजूचे 9 ते 10 हजार रुपये असलेले भाडे 15 ते 16 हजार रुपये करण्यात आले.

दरम्यान, डिझेलच्या दरात 12 रुपयांची वाढ झाली हाेती. मात्र, गेल्या महिन्यात 7 रुपयांनी डिझेलचे दर कमी झाल्यानंतर ही भाडेवाढ कमी हाेईल अशी अपेक्षा ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकांकडून व्यक्त हाेत हाेती. परंतु महिना उलटूनही त्यात बदल झालेला नाही.

ही आहेत भाडे कमी न हाेण्याची कारण

ट्रान्सपाेर्ट दरराेज 250 ते 300 ट्रक जिल्ह्यातंर्गत व इतर जिल्हे तसेच परराज्यात जातात. जिल्ह्यातंर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनांना परतीच्या ट्रीप मिळतात. परंतु इतर जिल्ह्यात वाहतूक करणाऱ्या वाहनांना परतीची ट्रीप मिळण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस वाट बघावी लागते.

अडचणींचा करावा लागतो आहे सामना

तसेच परराज्यात वाहतूक करणाऱ्या वाहनांना काेराेनामुळे विकस्ळीत झालेल्या व्यवसायाची घडी तसेच पावसामुळे पीकाचे माेठे नुकसान झाल्याने जिल्ह्यात येणाऱ्या शेती मालाची पुरवठा कमी हाेत असल्याने ट्रीप मिळण्यास अडचणी येत असल्याने बऱ्याचदा एकीकडील भाड्यावर अवलंबून रहावे लागत आहे. याचे प्रमाण तब्बल 50 ते 60 टक्के आहे. या कारणामुळे ट्रक ओनर्स असाेसिएशन भाडे कमी करण्यास तयार नाहीत.

जळगाव जिल्हा ट्रान्सपाेर्ट असाेसिएशन जसपाल बग्गा म्हणाले की, जिल्ह्यातील ट्रान्सपाेर्टच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणावर इतर ठिकाणी माल जाताे. परंतु परतीच्या ट्रीपसाठी वाहनांना थांबून रहावे लागते. त्यामुळे वाहन कमी पडतात. या कारणामुळे डिझेलचे दर कमी झाल्याने ट्रान्सपाेर्ट भाडे दरात किमान 12 ते 15 टक्के भाडे कमी हाेणे अपेक्षित असताना कमी हाेत नाही.

बातम्या आणखी आहेत...