आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:आरटीई : प्रतीक्षा यादीतील 346 प्रवेश झाले निश्चित ; आज अंतिम मुदत; आता मिळणार नाही मुदतवाढ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत शिक्षणाचा अधिकार या योजनेनुसार २५ टक्के प्रवेश अंतर्गत २०२२-२०२३ वर्षांकरिता प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. यात जिल्ह्यातील ५९४ विद्यार्थांचा समावेश आहे. ३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावयाचे असून गुरुवारपर्यंत ३४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. दरम्यान, शुक्रवारी प्रवेशाची अंतिम मुदत असून, आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील २८५ शाळांमधील ३१४७ जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार २९४० विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील २९४० पैकी २१७३ विद्यार्थ्यांनीच मुदतीअंती प्रवेश निश्चित केला. तर प्रतीक्षा यादीतील ५९४ विद्यार्थ्यांपैकी ३४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगिनमधून अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी, सदर अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन नजीकच्या गटसाधन केंद्र पंचायत समिती व शहरासाठी मनपा शिक्षण मंडळ कार्यालय येथे संपर्क साधून आपल्या बालकाचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा.

बातम्या आणखी आहेत...