आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश‎‎‎:आरटीई : दोन दिवसातच‎ जिल्ह्यात 642 अर्ज सादर‎

जळगाव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क‎ मिळावा या‎‎ उद्देशाने शिक्षण हक्क‎ कायद्यांतर्गत‎‎ (आरटीई) शाळांमध्ये‎ आर्थिक व दुर्बल‎‎ घटकांतील‎ मुलांसाठी २५ टक्के जागा‎‎ राखीव‎ असतात. शालेय शिक्षण‎‎‎ विभागातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक‎‎‎ वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश‎‎‎ प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना १‎ मार्चपासून ऑनलाइन नोंदणी‎ करण्याची सुविधा उपलब्ध‎ करण्यात आली आहे.

१७ मार्चपर्यंत‎ नोंदणी करता येणार आहे. पहिल्या‎ दिवशी एकही अर्ज सादर झाला‎ नव्हता. मात्र दुसऱ्या दिवशी‎ सकाळपासून पालकांनी अर्ज‎ भरण्याची गर्दी केल्याने दिवसभरात‎ ६४२ जणांनी अर्ज सादर केले‎ आहेत. यंदा आरटीई अंतर्गत‎ जिल्ह्यातील २८२ शाळांनी नोंदणी‎ केली असून ३१२२ जागा आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...