आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगावमध्ये मोफत शिक्षणाचा अधिकार अर्थात आरटीई या योजनेनुसार 25 टक्के प्रवेश अंतर्गत 2022-2023 वर्षांकरिता 165 जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीतील विद्यार्थ्यांना 28 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेवटच्या दिवसापर्यंत 59 विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहे. दरम्यान दुसऱ्या यादीतील प्रवेशासाठी दोन वेळेस मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिये करीता सन 2022-23 च्या शैक्षणिक वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यात 594 विद्यार्थ्यांची पहिली प्रतिक्षा यादी जाहीर झाली होती. त्यापैकी शेवटच्या दिवसापर्यंत 372 प्रवेश निश्चित झाले. यात 222 जागा रिक्त राहिल्या आहे. यापैकी 165 जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली. यासाठी सुरवातीला 21 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र प्रवेश कमी झाल्याने पुन्हा 28 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ देऊनही फक्त 59 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले. त्यामुळे 106 जागा रिक्त राहिल्या आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार पहिली निवड यादी 2940 विद्यार्थ्यांची जाहीर झाली होती. यात 2173 विद्यार्थ्यांनीच मुदतीअंती प्रवेश निश्चित केले तर पहिल्या प्रतीक्षा यादीतील 372 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.