आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ‎:आरटीई ; शाळा नोंदणीला मुदतवाढ‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा‎ या‎‎ उद्देशाने शिक्षणहक्क‎ कायद्यांतर्गत‎‎ (आरटीई) शाळांमध्ये‎ आर्थिक व दुर्बल‎‎ घटकांतील‎ मुलांसाठी २५ टक्के जागा‎‎ राखीव‎ असतात. शालेय शिक्षण‎‎‎ विभागातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक‎‎‎ वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश‎‎‎ प्रक्रियेसाठी २३‎ जानेवारीपासून‎ शाळांची‎ नोंदणी प्रक्रिया‎ सुरू‎ करण्यात आली. ३ फेब्रुवारीपर्यंत‎ नोंदणीसाठी मुदत देण्यात आली‎ होती. मात्र, राज्यात अनेक शाळांनी‎ नोंदणी न केल्याने १० फेब्रुवारीपर्यंत‎ मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत‎ जिल्ह्यातील २८० शाळांनी नोंदणी‎ अद्यापपर्यंत केलेली आहे.‎

गेल्या वर्षी जिल्ह्यात २८५‎ शाळांनी नोंदणी केली होती.‎ राज्यातील अनेक शाळांनी नोंदणी न‎ केल्याने नोंदणी प्रक्रियेसाठी‎ मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र,‎ शाळांना मुदतवाढ मिळाल्याने‎ विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रवेशास उशीर‎ होणार आहे. शाळांच्या प्रवेशाच्या‎‎ वेळापत्रकाकडे पालक आणि‎‎ विद्यार्थ्यांचे‎ लक्ष लागून आहे.‎‎ किचकट प्रक्रियेमुळे जिल्ह्यात गत‎ पाच‎ वर्षांत आरटीईच्या मोठ्या‎ प्रमाणावर जागा रिक्त‎ राहिल्या‎ आहेत.

त्यामुळे यंदा उपलब्ध‎‎ होणाऱ्या जास्तीत जास्त जागांवर‎ प्रवेश‎ करण्याचे आव्हान शिक्षण‎ विभागापुढे‎ उभे ठाकले आहे.‎ एकीकडे शाळांमध्ये‎ नवीन‎‎ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश‎ प्रक्रिया‎ सुरू‎ झाली. तर दुसरीकडे‎ आरटीई‎‎ प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप‎ जाहीर न‎‎ झाल्याने राज्यभरातील विद्यार्थी व‎‎ पालकांचे लक्ष‎ प्रवेशाकडे लागले‎ आहे.‎ सध्या नोंदणी झालेल्या २८०‎ शाळांमध्ये ३१०० जागा निश्चित‎ झाल्याचे सांगण्यात येते आहे.‎

बातम्या आणखी आहेत...