आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:आरटीई : दुसरी प्रतीक्षा यादी, प्रवेशासाठी 28 पर्यंत मुदत

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत शिक्षणाचा अधिकार अर्थात आरटीई या योजनेनुसार २५ टक्के प्रवेश अंतर्गत २०२२-२०२३ वर्षांकरिता १६५ जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २१ जूनपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली होती; मात्र ४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याने आता प्रवेशासाठी २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सन २०२२-२३ च्या शैक्षणिक वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यात ५९४ विद्यार्थ्यांची पहिली प्रतीक्षा यादी जाहीर झाली होती. त्यापैकी शेवटच्या दिवसापर्यंत ३७२ प्रवेश निश्चित झाले. यात २२२ जागा रिक्त राहिल्या आहे. यापैकी १६५ जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे.