आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई:165 जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर ; शाळेतील प्रवेशाची अंतिम मुदत 21 जूनपर्यंत

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत शिक्षणाचा अधिकार अर्थात आरटीई या योजनेनुसार २५ टक्के प्रवेश अंतर्गत २०२२-२०२३ वर्षांकरिता मंगळवारी १६५ जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांना २१ जूनपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता सन २०२२-२३च्या शैक्षणिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यात एकूण ५९४ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. त्यापैकी शेवटच्या दिवसापर्यंत ३७२ प्रवेश निश्चित झाले आहे. दरम्यान २२२ जागा रिक्त राहिल्या आहेत. यापैकी १६५ जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली. यंदा जिल्ह्यातील २८५ शाळांमधील ३१४७ जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार पहिली निवड यादी २९४० विद्यार्थ्यांची जाहीर झाली होती.

बातम्या आणखी आहेत...