आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीतर्फे सत्कार:म्हसावदच्या थेपडे विद्यालयात धावपटू लोकेश पाटील; ईशा वैद्य यांचा सत्कार

शिरसोली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसावद येथील थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी रोजी दर्बन (दक्षिण आफ्रिका) येथे कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत ९० किमी अंतर ९ तास ५५ मिनिटांत पूर्ण करणाऱ्या जगातील सर्वात तरुण धावपटू लोकेश पाटील व नीट परीक्षेत ६१० गुण मिळवल्याबद्दल ईशा वैद्य हिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन केदार थेपडे हेे हाेते. व्यासपीठावर लोकेशचे वडील संजय पाटील, सरपंच गोविंदा पवार, ग्रामपंचायत सदस्य शीतल चिंचोरे, मनोज पाटील, बापू सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित हाेते.

प्रास्ताविक जी. डी. बच्छाव यांनी केले. लोकेश पाटील व ईशा वैद्य यांचा विद्यालय व ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कबड्डीच्या विजेत्या संघालादेखील गौरवण्यात आले. १५ जानेवारीला काकांच्या पुण्यतिथीनिमित्त ५ किमी मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाईल. यात प्रथम येणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस दिले जाईल असे सांगितले. एस.जे. पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य एस. बी. सोनार यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...