आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चढ-उतार:धुक्यामुळे ‘सचखंड एक्स्प्रेस’‎ धावतेय साडेआठ तास उशिरा‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थंडी व धुक्यामुळे सचखंड एक्स्प्रेस‎ बुधवारी आठ तास उशिराने धावते‎ आहे. जळगाव स्थानकात सचखंड‎ एक्स्प्रेस सकाळी ५ वाजता येते. ही‎ गाडी तब्बल साडेआठ तास‎ विलंबाने धावत होती. ही गाडी‎ जळगाव स्थानकात दुपारी १.३०‎ वाजता आली. उत्तरेकडून‎ धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या‎ बुधवारी विलंबाने धावत होत्या.‎ गेल्या काही दिवसांपासून‎ तापमानात चढ-उतार सुरू आहे.‎ तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण‎ वाढत आहे. त्यातच उत्तर भारत व‎ दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात थंडीची‎ लाट असल्याचने त्याचा परिणाम‎ रेल्वेगाड्यांवर झाला. यातच‎ बुधवारी दिवसभर सूर्य न उगवल्याने‎ सकाळी उशिरापर्यंत दाट धुके‎ पसरले होते. या धुक्यामुळे सिग्नल‎ यंत्रणा व्यवस्थित दिसत नसल्याने‎ खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे‎ प्रशासनातर्फे अनेक एक्सप्रेस‎ गाड्यांना सुरुवातीच्या‎ स्थानकातूनच उशिराने सोडण्यात‎ आले. पर्यायाने सचखंड एक्स्प्रेस‎ आठ तास उशिराने धावली. तर‎ झेलम ६.३० तास, गोंदिया कोल्हापूर‎ महाराष्ट्र एक्सप्रेस, कर्नाटक‎ एक्स्प्रेस या गाड्या देखील उशिरा‎ धावल्या. या धुक्यामुळे अनेक रेल्वे‎ गाड्या ताशी ४० ते ५० वेगाने धावत‎ असल्याने या गाड्या नियमित‎ वेळापत्रकापेक्षा चार ते पाच तास‎ विलंबाने धावत आहेत. त्यामुळे‎ मनस्ताप सहन करावा लागतो.‎

बातम्या आणखी आहेत...