आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाेने दहा दिवसांपूर्वी ५२ हजार ५०० रुपये ताेळा (१० ग्रॅम) हाेते. शुक्रवारी मात्र, हे दर ५१ हजार १०० रुपयांवर आले. अर्थात, दहा दिवसांत १४०० रुपयांनी भाव घसरले. जगभरातील व्याजदरात सातत्याने हाेणारी वाढ आणि डाॅलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम साेन्यावर झाला असल्याचे जळगावातील सराफा व्यवसायातील तज्ञांकडून सांगितले जाते आहे.
गेल्या वर्षात साेन्याच्या दरात सातत्याने दरवाढ झाल्याचे पहायला मिळाले. साेन्याचे दर गेल्या वर्षी प्रतीताेळा ५५ हजार या उच्चांकी दरापर्यंत पाेहचले हाेते. त्यानंतर मात्र, ५१ ते ५२ हजार रुपये प्रतिताेळा दरम्यान साेन्याचे दर रेंगाळल्याचे दिसून आले आहे.
आंतरराष्ट्रीय धाेरणाचेही जाणवत आहेत परिणाम
अमेरीकेतील बँकांनी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बँका व्याजदर किती वाढवतात यावर साेन्याचे दर अवलंबून असेल. सुशिलकुमार बाफना, संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.