आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबराव पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका:म्हणाले - 'राष्ट्रवादी'तून आलेले पार्सल शिवसेना डब्यात घालेल; उध्दव ठाकरेंनी सावध रहावं

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंच्या अशा लोकांची ही महाप्रबोधन यात्रा नसून, हे आलेलं प्रोडक्ट राष्ट्रवादीचे आहे. ज्या प्रमाणे राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न केले. पध्दतशीर शिवसेना आज कामातून काढून टाकली. त्याचप्रमाणे उरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी नवीन पार्सल राष्ट्रवादीकडून इकडे आले, अशी टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केली.

उध्दव ठाकरेंनी अशा पार्सलपासून सावध रहावे. तुमच्या पक्षाला हे डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही, असे नम्रपणे त्यांना सांगावेसे वाटते, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मंत्री पाटील यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळीही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

कोणत्याही पक्षाला महाप्रबोधन करण्याचा आणि त्यांच्या नेत्यांना प्रचार करण्याचा अधिकार आहे. महाप्रबोधनाच्या यात्रेमध्ये शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढे काय करावे. शिवसेना पक्षाची कशी बांधणी करावी, जनतेला मुद्दे कसे पटवावे. जनतेमधील जी प्रचारसभा आहे. सभेत आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी महाप्रबोधन होत असते. ही महाप्रबोधन यात्रा नसून जातीजातीत तेढ निर्माण करण्याच्या सभा झाल्या. एकीकडे माझ्यासारख्याची जात काढली गेली, माझ्या आईवडीलांवर बोलल्या गेलं, अशा पध्दतीचा वाक्यप्रचार त्या ठिकाणी करण्यात आला. त्यांनी आल्यानंतर समाजांवर टीका केली. मुक्ताईनगर माझ्यासह आमदार चंद्रकांत पाटील यांची शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता सभा होती. त्यांचीही सभा होती.

जिल्ह्यात जमावबंदी कलम लागू आहे. त्याचबरोबर 50 मीटरच्या आत सभेची परवानगी असल्याने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी पालकमंत्री म्हणून विनंती केली. कायदा व सुव्यवस्था सांभाळणे जबाबदारी असल्याचे सांगितले. दोन्ही सभांची परवानगी नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. कुणी आमच्या समाजावर बोलत असेल, तेढ निर्माण करत असेल, जिल्ह्यात असे वातावरण तयार होत असेल तर ते थांबवण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. दिलेल्या सूचनेनुसार सभा घेणार नाही. विरोधी पक्षाच्या सूचना सत्ताधारी पक्षाने स्विकारल्या पाहिजेत. आमच्या काही त्रुटी असतील, काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत, हे सत्य आहे. त्यामध्ये दुरुस्ती करणार आहोत. विरोधी पक्षनेत्यांच्या सूचनांचा आदर करतो, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...