आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारिताेषिक वितरण:समूह नृत्य स्पर्धेमध्ये साेल एंजल ग्रुप प्रथम

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशनतर्फे सुरभीनगरात नवसाचा गणपती उत्सवात सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात समूहनृत्य स्पर्धेत ‘सेाल एंजल ग्रुप’ प्रथम, ‘माेरया गर्ल्स ग्रुप’ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्यांना डीवायएसपी साेमनाथ वाकचाैरे यांच्याहस्ते पारिताेषिक वितरण करण्यात आले.

व्यासपीठावर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, ट्राॅमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मयूर चाैधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार, बांधकाम व्यावसायिक राजेश राका, बाबू चाेरडिया उपस्थित हाेतेे. जय गणेश फाउंडेशन सांस्कृतिक अभिरुची वाढवण्याचे काम करते आहे. किंबहुना, सामाजिक एकता, सलाेखा अबाधित ठेवण्यावरही भर देत आहे. इथल्या कलारसिकांची सांस्कृतिक भूक फाउंडेशनच्या माध्यमातू भागवण्याचे काम पथदर्शी आहे, असे डीवायएसपी साेमनाथ वाकचाैरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...