आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरी नदीच्या पात्रात 15 दिवस भरत असते यात्रा‎:संत सखाराम महाराजांची‎ 22 एप्रिलपासून यात्रा‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर येथील श्री संत सखाराम‎ महाराजांच्या यात्रोत्सवाला २२‎ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. बोरी‎ नदीच्या पात्रात १५ दिवस ही यात्रा‎ भरणार आहे. यात भजन,‎ कीर्तनासह विविध धार्मिक,‎ सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल‎ असते. या यात्राेत्सवाला‎ खान्देशातून नागरिक येतात.‎ २२ रोजी अक्षय्य तृतीयेच्या‎ मुहूर्तावर सकाळी ९ वाजता‎ स्तंभारोपण व ध्वजारोहणाने‎ यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. २२‎ ते २९ एप्रिल दरम्यान तुकाराम‎ महाराज गाथा भजन होईल.

३०‎ रोजी तुकाराम महाराज भजन गाथा‎ समाप्ती होईल. याच दिवशी‎ सकाळी ७.३० वाजता मोहन‎ महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे‎ शहरात आगमन होईल. या दिंडीचे‎ स्वागत करण्यासाठी संत सखाराम‎ महाराज संस्थानाचे गादीपती प्रसाद‎ महाराज हे वेशीवर स्वागताला‎ जातील. मोहिनी एकादशी, अर्थात १‎ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता‎ रथाची मिरवणूक निघेल. ४ मे रोजी‎ संत सखाराम महाराज यांच्या‎ पुण्यतिथीनिमित्त सर्व रोग निदान‎ शिबिराचे आयोजन केले जाणार‎ आहे.

५ मे रोजी सकाळी सहा‎ वाजता श्री लालजींच्या पालखी‎ मिरवणूक सुरू होईल. तर ६ मे रोजी‎ सकाळी १० ते १२ या वेळेत मोहन‎ महाराज बेलापूरकर यांचे काल्याचे‎ कीर्तन होऊन यात्रोत्सवाची सांगता‎ होणार आहे.‎ दरम्यान, यात्राेत्सवाला‎ जळगावसह खान्देशातून माेठ्या‎ संख्येने भाविक येत असल्याने‎ त्यादृष्टीने नियाेजन सुरू असल्याचे‎ श्री संत सखाराम महाराज मंदिर‎ प्रशासनाने सांगितले.‎