आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी घोटाळा:माध्यमिक पाठोपाठ प्राथमिक विभागातील 67 शिक्षकांचे पगार रोखले; शिक्षकांमध्ये खळबळ

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी 2019 मध्ये गैरप्रकार झाला आहे. या घोटाळ्यात माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागातील काही शिक्षक दोषी आढळून आले आहेत. जिल्ह्यातील माध्यमिकच्या 71 तर प्राथमिक विभागातील 67 शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील 614 जणांनी टीईटी परीक्षेचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती शासनाकडे आहे. त्या अनुशंगाने टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू आहे. गेल्या आठवड्यात माध्यमिक विभागाच्या 71 शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश मिळाले होते. तर शनिवारी प्राथमिकच्या 67 शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना मिळाले आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता विद्यार्थी संघटनांनी देखील आक्रमक भुमिका घेतली आहे. बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरुन कमी करावे अशी मागणी काही संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या शिक्षकांना बोगस प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सक्रीय असलेल्या दलालांची देखील पोलिसांकडू चौकशी करण्यात येणार आहे.

तालुक्यात सर्वाधिक शिक्षक

टीईटी घोटाळ्यात जळगाव शहर आणि तालुक्यात प्राथमिक विभागाचे एकूण 19 शिक्षक आढळुन आले आहेत. यात स्मिता सिसोदे (कै.जि.एन.चांदसरकर बालमोहन शाळा), देशमुख शरीनाबेगम (मिल्लत प्राथमिक स्कूल), राहुल वंजारी (सौ.के.जी.मनियार प्राथ.विद्यालय), रितेश वंजारी (सौ.के.जी.मनियार प्राथ. विद्यालय), कल्पीता खोरे, रुकसाना तडवी, प्रशांत चौधरी, पुजा बागुल (पाचही शिक्षक छत्रपती शिवाजी विद्यालय), सद्दाम तडवी (श्री.स्वामी समर्थ विद्यामंदिर, कुसुंबा), अमोल कोल्हे (श्री संत मुक्ताबाई प्राथ. विद्यामंदिर), दिनेश चव्हाण, शैलेश वाघ, सुनिल बारेला, प्रशांत पाटील, वैशाली पाटील, तान्या भातकर, राजेंद्र जोगी (सर्व सात शिक्षक प्राथमिक शाळा, म्हसावद)

तालुकानिहाय संख्या

जळगाव शहर व तालुका 19, अमळनेर व चोपडा प्रत्येकी 7, भुसावळ 10, चाळीसगाव, धरणगाव व रावेर प्रत्येकी 2, एरंडोल व जामनेर प्रत्येकी 6, पाचोरा व यावल प्रत्येकी 1, पारोळा 4

दलालांवर नजर

शिक्षकांना प्रमाणपत्र मिळवून देणारे अनेक दलाल राज्यभरात सक्रिय असल्याचे या चौकशीत समोर आले आहे. या सर्वांवर यंत्रणांची नजर आहे.

बातम्या आणखी आहेत...