आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे डब्यात व स्थानकात विना परवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची संख्या वढली आहे. अशा विना परवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. अनेकदा अशा खाद्य पदार्थांमधून गुंगीचे औषधी देऊन गैर प्रकार होत असतात. विना परवाना खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.
अनेक रेल्वे स्थानकांवर गाडी थांबल्यानंतर अनेक विक्रेते घरगुती तयार केलेले खाद्य पदार्थ विकणारे विक्रेते कोणाचीही परवानगी न घेता सरळ रेल्वेत येऊन प्रवाशांना खाद्यपदार्थ विकतात. अनेकदा या खाद्यपदार्थांमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर अथवा रेल्वे गाडीत विनापरवाना खाद्यपदार्थ विकायला बंदी घातली असली तरी अनेक विक्रेते हे असे खाद्यपदार्थ विक्री करताना आढळून येतात अशा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले.
रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी
रेल्वेत कुणी अशा पद्धतीने विना परवाना खाद्य पदार्थ विक्री करत असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. परवानाधारक विक्रेत्यांना ओळखपत्र बंधनकारक आहे. ओळखपत्र पाहूनच खरेदी करा अन्यथा अशा विक्रेत्यांकडून खाद्य पदार्थ न घेण्याची दक्षता प्रवाशांनी बाळगावी.
- ज्ञानेश्वर पाटील, आरपीएफ पोलिस निरीक्षक
पॅकिंगचेच पदार्थ घ्यावे
प्रवाशांनी प्रवास करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अवैध वा परवाना नसलेल्या विक्रेते कॉलेटीचे पदार्थ विकतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रवाशांनी नाशवंत वा उघड्यावरील पदार्थ खरेदी करू नयेत. अनेक अवैध परवाना नसलेले खाद्य पदार्थ विक्रेते हे उघड्यावर असलेले पदार्थ विकतात. त्यामुळे प्रवाशांनी पॅकिंगचे पदार्थ एक्सपायरी तारीख पाहूनच खरेदी करावेत.
- राजेश भराडे, खान्देश रेल्वे प्रवासी मंच
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.