आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्याचे स्मरण:शाळांमध्ये कथाकथन, भाषण, वक्तृत्व स्पर्धेतून टिळक, साठे यांना अभिवादन

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध शाळांमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम झाले. यावेळी विद्यार्थांनी कथाकथन, वक्तृत्व स्पर्धांमधून लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण केले. तसेच लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पेहराव करून त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.

शारदा माध्यमिक विद्यालय : येथे कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. मोहित सुरळकर, रजनी शितोडे, मुस्कान तडवी यांनी समाज सुधारकांच्या कार्याची माहिती दिली. रवींद्र पाटील यांनी प्रतिमापूजन केले.महाराणा प्रताप विद्यालय : येथे वक्तृत्व स्पर्धा झाली. इशांत काकडे, दिशा फुलमाळी, कामेश सपकाळे, सोहम शिंपी यांनी भाषणातून उपस्थितंाची मने जिंकली. यावेळी विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.

सीताबाई गणपत भंगाळे : विद्यालयात विद्यार्थांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची आठवण म्हणून त्यांच्या वेशभूषा करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे यांनी पूजन केले. यावेळी विजया चौधरी, सारिका सरोदे, अनुपमा कोल्हे उपस्थित हाेते.ममुराबाद जिल्हा परिषद इंग्लिश स्कूल : येथे मुख्याध्यापक अविनाश मोरे यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कल्पना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती चौधरी यांनी आभार मानले.

या शाळांमध्ये झाले कार्यक्रम : झिपरू अण्णा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, दी पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप विद्यालय, विद्या विकास मंदिर प्राथमिक शाळा, श्रीराम तरुण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, संस्कृती माध्यमिक विद्यालय, मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय, रावसाहेब रूपचंद विद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय, सुशीलाबाई वामनराव अत्रे प्राथमिक विद्यामंदिर, समता जागृती बहुउद्देशीय संस्था.

मातंग लहुजी प्रतिष्ठान, मातंग समाजतर्फे वक्तृत्व स्पर्धा
पाळधी येथील मातंग लहुजी प्रतिष्ठानतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची शताब्दी जयंती महोत्सवानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमात धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, युवा उद्योजक विक्रम गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरेश महाराज सार्वेकर यांचे व्याख्यान झाले. राकेश कंखरे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...