आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रींच्या जीवनकार्य:महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना अभिवादन

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळांमध्ये रविवारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त महापुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. भाषणातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गांधीजी व शास्त्रींच्या जीवनकार्याची माहिती दिली.

बी. यू. एन. रायसोनी : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने अहिंसा पुरस्कार वितरण करण्यात आले. यात प्री -प्रायमरी विभागातून रुद्र पाटील, तनिष्क उगले यांना सन्मानित करण्यात आले.

बहिणाबाई विद्यालय : शाळेत मुख्याध्यापक टी. एस. चौधरी यांनी प्रतिमापूजन केले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध व हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. प्रतिभा खडके व शंकर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.लुंकड कन्याशाळा : सौ. प. न. लुंकड कन्या शाळेत मुख्याध्यापिका स्वाती नेवे, अनिल सैंदाणे यांनी प्रतिमापूजन केले. साहेबराव बागुल यांनी सर्वधर्मीय प्रार्थना गायली.

पोदार जम्बो किड्स : पोदार जम्बो किड्समध्ये मुख्याध्यापिका उमा वाघ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. प्रथमेश पाटील यांनी गांधींजींची, अवनीश चौधरी याने लालबहादूर शास्त्री यांची तर ध्येया पाटील हिने कस्तुरबांची वेशभूषा साकारली. या वेळी मुख्याध्यापक गोकूळ महाजन व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.
ललित कला भवन : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवनात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. व्ही. ठाकरे यांनी सत्य व अहिंसावर मार्गदर्शन केले.

पलोड पब्लिक स्कूल : काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये स्वाती अहिराव, जयश्री चौधरी, संतोष शिरसाळे यांनी प्रतिमापूजन केले. विद्यार्थिनी सई पाटील, आराध्या साखरे यांनी महात्मा गांधींबद्दल माहिती सांगितली.

प्रोग्रेसिव्ह व प्रगती शाळा : प्रोग्रेसिव्ह शाळेत शरयू भावसार, सविता खडसे यांनी गाण्यातून विभूतींना आदरांजली वाहिली. सुवर्णा शिराळकर, अविदीप पवार, दीपक बारी व मुख्याध्यापिका सुषमा थोरात, शोभा फेगडे श्रद्धा दुनाखे, मनीषा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

प. वि. पाटील विद्यालय : प. वि. पाटील विद्यालयात मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी प्रतिमापूजन केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषणे आयोजित केली होती. झंवर विद्यालयात महापुरुषाचे स्मरण : पाळधी येथील स. नं. झंवर विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय समितीचे चेअरमन सुनील झंवर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याध्यपिका शाेभा ताेतला, न्यू इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल कल्पना पाटील व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते. विद्यार्थी मुकेश सूर्यवंशी व मानसी पाचपाेळ यांनी भाषणे दिली. गिरीश पंडित, डी. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. आचार्य विद्यालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम
डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात गांधी व शास्त्री जयंतीनिमित्ताने मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या हस्ते प्रतिम पूजन करण्यात आले. वंदना सावदेकर, तुषार पुराणिक यांनी मनाेगत व्यक्त केले. ईश्वरी चौधरी या विद्यार्थिनीने महात्मा गांधी यांच्याविषयी इंग्रजीतून भाषण दिले. देबलीना चॅटर्जी यांनी भजन सादर केले. या वेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते.

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूजन
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक सी. बी. अहिरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आर. एल. पाचपांडे व एस. बी. रत्नपारखे यांनी मनाेगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शाळा परिसर स्वच्छ केला. एन. एम. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. जोशी यांनी आभार मानले. या वेळी पर्यवेक्षक बी. आर. खंडारे, डी. एन. पाटील, पी. के. चौधरी, स्काऊट मास्टर, गाइड कॅप्टन उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...