आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास विशेष पथकाकडे:गुन्ह्याशी संबंधित संवाद‎ नमुने पाेलिसांकडे जमा‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएचआर पतसंस्था घोटाळा‎ प्रकरणी मुख्य संशयित सुनील‎ झंवर यांना जामीन मिळवून‎ देण्यासाठी तत्कालीन विशेष‎ सरकारी वकील प्रवीण चव्हाण,‎ अॉडिटर शेखर सोनाळकर‎ यांच्यासह चाळीसगावचा वाइन‎ शॉप चालक उदय नानाभाऊ‎ पवार या तिघांनी सुनील झंवर‎ यांचा मुलगा सूरज याच्याकडून‎ १ कोटी २२ लाख रुपये खंडणी‎ घेतल्याच्या गुन्ह्याचा तपास‎ विशेष तपास पथकाकडून केला‎ जातो आहे.

यात तीन‎ दिवसांपासून फिर्यादी सूरज‎ झंवर, सुनील झंवर, तेजस मोरे‎ व आयुष मणियार यांचे जबाब‎ सुरू होते. शनिवारी पोलिसांनी‎ सर्वांचे जबाब पूर्ण केले. तसेच‎ फिर्यादी सूरज झंवर यांना‎ खंडणी मागितल्याच्या अॉडिओ‎ पुरावे, सीसीटीव्ही फुटेज‎ पोलिसांनी जमा केले. हे सर्व‎ पुरावे सूरज झंवर यांनी तयार‎ करून फॉरेन्सिक डिपार्टमेंट‎ यांच्याकडून प्रमाणित केले होते.‎ तरी देखील तपासाचा भाग‎ म्हणून हे पुरावे पुन्हा एकदा‎ तपासून प्रमाणित केले जाणार‎ आहेत. पोलिस अधीक्षक‎ कार्यालयात तयार करण्यात‎ आलेल्या कक्षात जबाब घेतले‎ जात आहेत. सोमवारी आणखी‎ काही जणांचे जबाब हाेतील.‎

बातम्या आणखी आहेत...