आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील संगीता संजय साळुंखे यांची वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांची ही निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजीवनी छत्रपती रत्नपारखी, रत्ना प्रमोद सोनवणे, माधुरी मनोज चौधरी, अनिता प्रवीण सपकाळे, जनाबाई आनंदा पाटील, महासचिवपदी मनीषा फकिरा मराठी, कोषाध्यक्षपदी सुलोचना पुरुषोत्तम खोब्रागडे, सचिवपदी लता सुभान सपकाळे, संपर्क प्रमुखपदी वत्सला तुकाराम चौधरी, संघटकपदी संगीता बेडसे, सह संघटकपदी मंगला योगेश राखुंडे तर सदस्य म्हणून इर्शाद लोकमान तडवी, प्रमिला प्रकाश तामस्वरे, ज्योती अवनीश सावळे, रूपाली गणेश रावत, पाैर्णिमा राहुल सोनवणे, कांता भीमराव कदम, वर्षा भारत शिरसाट, रत्ना सिद्धार्थ खरे यांची निवड करण्यात आली आहे.
संगीता साळुंखे व त्यांच्या चमूने अनेक वर्षापासून तळागाळातील लोकांपर्यंत पक्ष व संघटनेचे ध्येय-धोरण पोहोचवले आहे, याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी संगीता साळुंखे यांची जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड केली आहे. यानिमित्त शहरातील संत गाडगेबाबा नगर येथील त्यांच्या निवासस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, पाचोरा तालुकाध्यक्ष विशाल बागुल, तालुका महासचिव दीपक परदेशी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन संगीता साळुंखे व संजीवनी रत्नपारखी यांचे काैतुक केले.
या निवडीबद्दल मित्र परिवार, पदाधिकाऱ्यांसह सर्वत्र त्यांचे कौतुक हाेत आहे. यापुढे वरिष्ठांच्या आदेशाने गावागावात नव्याने वंचित बहुजन आघाडीच्या शाखा स्थापन करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही संगीता साळुंखे यांनी या वेळी दिली. या वेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्षा संगीता साळुंखे यांचे काैतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.