आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या भुवया उंचावल्या:खडसेंविराेधात दंड थाेपटलेले संजय पवार अजितदादांना भेटले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत विराेधी पॅनलमधून उमेदवारी केलेले संजय पवार यांनी विजयी पताका फडकावल्यानंतर मंगळवारी विराेधी पक्षनेता अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे दरवाजे बंद झाल्याची घाेषणा एकनाथ खडसेंनी केल्यानंतर आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत संजय पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या पॅनलमधून उमेदवारी केली हाेती. राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले पवार विराेधकांना जाऊन मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन संजय पवार यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद झाल्याची घाेषणा केली हाेती. त्यानंतर संजय पवार यांनीदेखील खडसेंसह सहकार पॅनलवर टीकास्त्र साेडले हाेते.

बातम्या आणखी आहेत...