आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानातील भिलवाडा येथील घोडास डांगच्या सरजूदास महाराजला अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. सरजूदासचे आश्रम जळगाव, बद्रीनाथ व अयोध्या येथे आहेत. जळगावच्या शाहूनगर हनुमान मंदिरात सरजूदासचे शिष्य बालकदास यांच्याकडे शुक्रवारी भिलवाडा पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे जळगावात आढळून आले. सरजूदास महाराज भिलवाडाच्या घोडास डांग येथे पाच आश्रमांचा प्रमुख आहे. देशभरात त्याचे शेकडो भक्त आहेत.
कोरोना काळात सरजूदासने आश्रमात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या पाचही आश्रमातून काही महत्त्वपूर्ण कागदपत्र भिलवाडा पोलिसांना मिळाले. तक्रारकर्त्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबानुसार सरजूदासने आत्महत्येची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलगी पोलिसांत गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. एका पीडितेसह आणखी पाच तरुणींनी सरजूदास विरुद्ध जबाब दिले आहेत.
जळगावातील एका अल्पवयीन मुलीसोबत माेबाइलवर चॅटिंगनंतर सरजूदासचे संबंध समोर आले. त्यामुळे हे प्रकरण आता जळगावपर्यंत येऊन पोहोचले आहे. सरजूदासचे शिष्य म्हणवणारे बालकदास महाराज हे शाहू नगरातील हनुमान मंदिराचे प्रमुख आहेत. भिलवाडा पोलिसांनी शुक्रवारी जळगावात येऊन बालकदास महाराज यांची चौकशी केली. चौेकशीसाठी बालकदास यांना ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.