आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचा प्रकोप:जळगावमध्ये सर्पमित्रांनी वादळातून वाचवले 350 पेक्षा जास्त पोपट, मात्र 300 पोपटांचा गेला जीव

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव येथील ऑर्डनन्स फॅक्ट्री वरणगावात शुक्रवारी झालेल्या पावसाळी वादळामुळे झाडांच्या फांद्या तुटल्याने शेकडो पोपट जखमी झाल्याची घटना घडली. असे असताना या वादळात 300 पोपटांचा मृत्यू झाला. तर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत जखमी असलेल्या 350 पोपटांना जीवदान दिले. उपचार केल्यानंतर शनिवारी या पोटपटांना मुक्त करण्यात आले.

अचानक आलेल्या वादळी पावसाच्या माऱ्याने ओले होऊन पाऊस पडावा तसे एक एक करत शेकडो पोपट झाडावरून पडू लागले. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र निशांत रामटेके यांना माहिती दिली.

मृत झालेले पोपट
मृत झालेले पोपट

रामटेके यांच्यासह स्वप्नील सुरवाडे, भूषण कोळी, लखन लोहारे, अक्षय तेली, मनीष कोळी, सागर कोळी, राहुल कोळी, हर्षल कोळी, प्रतीक मेढे, धिरज सुरवाडे, आकाश सोनार, अनिकेत वांकेडे, कुणाल गुरचड, ललित, लखन रानसिंगे, मनोज अंबोडे, राहुल खरात, ओम शिंदे यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी पोपटांना सुरक्षित ठिकाणी हलवले. काही पोपटांना पिंजऱ्यात ठेवले. परीसरातील एका खोलीत पोपटांना एकांतात सोडून खिडकी दार उघडे ठेवण्यात आले. बाहेरुन मांजर किंवा कुत्रा आत येणार नाही याची काळजी घेण्यात आली.

तासाभरात तणाव कमी झाल्याने पोपटांनी आकाशात भरारी घेतली. उर्वरित पोपटांना रात्रभर खोलीत ठेवले. वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे बाळकृष्ण देवरे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत शनिवारी सकाळी सुमारे 300 पोपटांना वनविभागाच्या निगरानीत मुक्त करण्यात आले. वनपाल दिपश्री जाधव, वनरक्षक सुनील चिंचोले, वनरक्षक खांडरे, वनरक्षक वानखेडे, डॉ.एस.एन. कोल्हे यांनी सहकार्य केले. रस्त्यावरील मृत पक्षी कुत्रे, मांजरानी रात्रीत उचलून नेले. झाडांच्या पालापाचोळ्यात पडलेले मृत पक्षी एकत्र करुन पंचनामा करत त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...