आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:न्यायालयीन आदेशाचे पत्र देण्यास टाळाटाळ, सतीश पाटलांचे उपोषण

पारोळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पारोळा येथील गटविकास अधिकाऱ्यांवर व्यक्त केला रोष

तालुक्यातील करमाड खुर्द येथील सरपंच बंडू भिल यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले होते. या विरोधात भिल यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांचे सरपंच पद कायम ठेवण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु हा निकाल प्राप्त होऊनही गटविकास अधिकारी त्याबाबतचे आदेश भिल यांना आदेशाचे पत्र देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी सरपंच भिल यांच्यासह पंचायत समितीच्या आवारात बुधवारी उपोषण केले.

गटविकास अधिकारी विकास लोंढे हे सरपंच बंडू भिल यांना सरपंच पद कायम असल्याच्या आदेशाची प्रत देत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका, माजी मंत्री डॉ. पाटील यांनी घेतली. शेवटी दोन तासात गटविकास अधिकारी लोंढे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याशी चर्चा करून, आदेशाचे पत्र देत उपोषण सोडवले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, माजी संचालक पंडित पाटील, मनोराज पाटील, माजी सरपंच भैय्या पाटील, संतोष महाजन, सरपंच भैय्यासाहेब रोकडे, सुनील पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लवकरच ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार
गेल्या तीन दिवसांपासून सरपंच भिल हे आदेश मिळवण्यासाठी सातत्याने पारोळा पंचायत समितीचे उंबरठे झिजवत होते. त्यामुळे गटविकास अधिकारी लोंढे यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...